औरंगाबाद: आज 'कारगिल विजय दिना'चे औचित्य साधून भारतीय सैन्याची पराक्रमाची, शौर्याची यशोगाथा तरुणांचा अंतःकरणी बिंबवण्यासाठी 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक' हा देशभक्तीपर सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात मोफत दाखवण्यता येत आहे. शहरातील विविध चित्रपटगृहात हा चित्रपट पाहण्यासाठी शालेय विद्यार्थी तसेच महाविद्यालयीन तरुण तरुणींनी चित्रपटगृहा बाहेर मोठी गर्दी केल्याचे चित्र आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून देशातील युवकांमध्ये जोश जागवण्याचा प्रयत्न यानिमित्ताने होणार होत आहे.
तरुणांच्या अंगी देशभक्तीची भावना रुजावी. भारतीय सैन्याची पराक्रमाची व शौर्याची जाणीव युवकांना व्हावी. या उद्देशाने महाराष्ट्रातील ४९७ चित्रपट गृहात हा चित्रपट मोफत दाखवण्यात येत आहे. जवळपास अडीच लाख युवक यामाध्यमातून हा चित्रपट पाहनणार आहे. तसेच आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवून शत्रूंपासून देशवासीयांची रक्षण करण्यासाठी सीमेवर अहोरात्र झटणाऱ्या जवानांप्रती आपली सहनुभूती व्यक्त करण्यासाठी प्रत्येक युवकाने हा चित्रपट पाहावा व आपल्या मित्रांना देखील यासाठी प्रेरित करावे असे आवाहन संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले आहे.
"उरी दि सर्जिकल स्ट्राईक"
हा चित्रपट १८ सप्टेंबर २०१६ रोजी काश्मीर मधल्या उरी येथे भारतीय सैन्यावर झालेल्या हल्यावर आधारित हा चित्रपट असून या हल्यात १८ सैनिक शहीद झाले होते. या हल्याला प्रतिउत्तर देत भारतीय सैन्याने ५० अतिरेक्यांना कंठस्नान घातले होते. १ जानेवारी २०१९ रोजी “उरी दि सर्जिकल स्ट्राईक” हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता कारगिल दिनानिमित्त युवक युवतीमध्ये पुन्हा एकदा नवचेतना निर्माण करण्यासाठी येत्या २६ जुलै रोजी पुन्हा एकदा हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.